Kavi Kishor Pathak
कागद...एक कुरुक्षेत्र आणि माझ्या आत कवितेच्याच गर्जना... सर्वत्र!
Pages
कविता
परिचय
पुरस्कार
संपर्क
इतर उल्लेखनीय
Monday, January 13, 2014
बाळं गुणी झोपलियेत
बाळं गुणी झोपलियेत
त्यांना भीती नाही अंधाराची, बुवाची वा स्वप्नांची!
त्यांना आधार माझ्या थोपटण्याचा
आणि
विश्वास माझ्या तळहातावरच आहे त्यांच्या भवितव्याची शाल ह्याचा
बाळं अशीच झोपू दे विश्वाच्या अंतापर्यंत
जगही रांगू लागेल जगण्याच्या लयीत!
Thursday, November 28, 2013
कवितेचे दिसणे
कवितेचे दिसणे म्हणजे आपण नसणे
गर्भात उमलते मूल मनाशी हसणे
पान्हावुन येते कूस जगन्मातेची
रे कविता म्हणजे कुशीत जाऊन बसणे
ही कविता करते अशी जिवची लाही
कुरतडतो कागद लिहितो काहीबाही
जलधारांमध्ये सचैल भिजता भिजता
का वणवा आतला अजून पेटत राही
कवितेचा होतो जाळ पेटते पाणी
ही कविता होते थंड गोठती गाणी
कवितेचा जेव्हा ओठ जरा थरथरतो
ओळींवर हिरव्या बागडते फुलराणी
कवितेचा होतो स्पर्श लहरते काया
एकटेपणा लागतो असा बोलाया
रे फिरतो वणवण होत जगाशी परके
उबदार असे शब्दांची सोबत माया
काळीज कसे कवितेचे ओले असते
कोरडी कातडी बघून केव्हा रुसते
एकांतसमुद्री बुडते ज्याची भाषा
स्वप्नात तयाशी कविता बोलत बसते
(
आभाळाचा अनुस्वार
)
वाट
तू ही अक्षरे गोळा करून
काय करतो आहेस ह्या नि
:
शब्द अरण्यात
?
इथे शब्द पेरीत नाहीत त्यांचा श्वास मातीत
देठावर आशयाचे फूल मौनमुग्ध
आणि फुलात सुगंधाच्या गुदमरलेल्या हाका
...
झाडाला असतील उकार वेलांट्यांसारख्या
फांद्या
,
अक्षरांना हुंदडण्यासाठी
पण गदागदा हलवले झाड
तरी सडा तर पडणार नाहीच
पन सळसळीचा हुंकारही
पानातून येणार नाही
...
तू हा पाचोळा घेऊन
कुणाची वाट पाहतो आहेस
?
ठिणगीची
?....
(
आभाळाचा अनुस्वार
)
Tuesday, October 8, 2013
रुबाई...
१) हे रोज झगडणे ध्येयासाठी कशाला
काबाडकष्ट अन दगदग हवी कशाला
हे बरे
,
आहे त्या स्थितीत मस्त रहाणे
अन शांत निजावे घेऊन दैव उशाला
२) आम्ही युगायुगांचे नशाबाज शब्दांचे
ते ढोसुन ढोसुन अट्ट्ल बनलो नाचे
ही पुचाट व्यसने तुम्हास हो लखलाभ
दररोज पितो रे अर्क चंद्रसूर्याचे
३) ह्या रस्त्यावरती मुडदे रोज पहातो
डोळ्यावर पट्टी बांधून चालत र्हातो
भोसकले कोणी गळा दाबला तर मी
राष्ट्रगीत तेव्हा उच्च रवाने गातो
(
मी मृगजळ पेरीत)
Thursday, September 12, 2013
संवाद दिवाळी अंक २०१३
Monday, September 9, 2013
तुझे आणि माझे
तुझे आणि माझे
नसतेच काही
नुसतीच लाही फुटफुटे
तसे आपलेसे
कुणीही नसते
प्रारब्ध हसते पानोपानी
दूरस्थाच्या खुणा
हाकारती नित्य
एकट्याचे सत्य पोरकेसे
तेव्हा आणि आता
नसतो फरक
स्वर्ग नि नरक जसे शब्द
तुझे आणि माझे
असलेच काही
कळायाचे नाही दोघांनाही
(निरूपण)
अभंग
होतात? होऊ दे
कवितांच्या ओळी
कानांच्या पाळी
तापणार
जातात? जाऊ दे
शब्दही गळून
थोडेसे जळून
पहावे ना!
येतात? येऊ दे
काळजांचे ठोके
तेवढेच जागे
स्पर्शसुख
(निरूपण)
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)