संपर्क

किशोर त्र्यंबक पाठक

१ / २, गौतमाई, राधे रो-हाऊसेस,
राजसारथी सोसायटी मागे,
इंदिरा नगर, नाशिक - ४२२ ००९

दूरध्वनी: (०२५३) २३२०५२४
भ्रमणध्वनी: ०९४२२२५६९०२


 

3 comments:

  1. विशेष आंतरराष्ट्रीय विनाशुल्क खुली दिवाळी अंक स्पर्धा 2014.
    मराठी भाषेचा अभिजात दर्जा टिकवण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील व मराठी भाषा बोलणा-या प्रत्येकाची आहे. महाराष्ट्राला मराठी साहित्याचा अभिजात वारसा लाभलेला आहे. साहित्यकार, पत्रकार आणि नवोदित लेखकांच्या लेखन कौशल्याने निर्माण होणा-या दिवाळी अंकाने मराठी साहित्याला वेगळा दर्जा प्राप्त करून दिला आहे. यातूनच नवलेखकांना प्रतिवर्षी संजीवनी मिळत असते. त्यामुळे भविष्यात मराठी भाषेचा आणि साहित्याचा अभिजात दर्जा टिकवायचा असेल तर प्रत्येकाने व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करायला हवे.

    या स्पर्धेत उत्कृष्ट संपादन, उत्कृष्ट मांडणी, उत्कृष्ट छपाई, खास मुलांसाठी प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक, विनोदी साहित्य, उत्कृष्ट कादंबरी, उत्कृष्ट कथा, उत्कृष्ट लेख, उत्कृष्ट मुलाखत, उत्कृष्ट कविता, हास्यचित्रे, ई दिवाळी अंक, सामाजिक दिवाळी अंक, ध्वनीफिती, ध्वनीचित्रफिती, ब्रेललिपी, अनियतकालिक, शिक्षण विषयक, समाज प्रबोधन आणि उत्कृष्ट मुखपृष्ट अशा 25 प्रकारामध्ये 25 पुरस्कार स्मृती चिन्हाच्या स्वरुपात देण्यात येतील. साहित्य जगतात आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेचा पुरस्कार मानाचा समजला जातो. केलेल्या कामाची पसंती आणि पोचपावती म्हणून मिळणा-या पारितोषिकांचे स्वरूप वेगवेगळे असते. काही पारितोषिके स्थानिक पातळीवर तर काही पारितोषिके जागतिक पातळीवर प्रतिष्ठेची समजली जातात. या पारितोषिकांनी सन्मानित होणा-या व्यक्तींची जागतिक पातळीवर दखल घेतली जाते. अशाच पारितोषिकामध्ये आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेच्या पुरस्काराचा समावेश होतो. वेगळी वाट धरून साहित्यविश्वात वेगळा ठसा उमटवणा-या तसेच वेगळा प्रवाह निर्माण करणा-या दिवाळी अंकांना या बहुप्रतिष्ठीत पुरस्काराने सन्मानित केले जाते. म्हणूनच साहित्य विश्वात या पुरस्काराचे वेगळेच स्थान आहे. महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील शेकडो नामवंत प्रकाशन संस्था आपले दिवाळी अंक या पुरस्काराच्या स्पर्धेत उतरवतात. लेखक, कवी, संपादक, प्रकाशक, वितरक, मुद्रक, मराठी साहित्याबद्दल प्रेम असणारे रसिक अशा सर्वांचा एक स्नेहसोहळा या निमित्ताने साजरा होतो.


    विशेष आंतरराष्ट्रीय विनाशुल्क खुली मराठी दिवाळी अंक स्पर्धेमध्ये दिवाळी अंकातील साहित्य, वैविध्य, मांडणी आणि छपाईचा दर्जा या संदर्भात गुणवत्तेच्या निकषावर सर्वोत्कृष्ट अंकांना वरील 25 प्रकारामध्ये मान्यवर मराठी व्यक्तीच्या हस्ते गौरवपर स्मृतीचिन्ह जयसिंगपुरात प्रदान केली जातील. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व दिवाळी अंकांना सहभाग प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. स्पर्धेसाठी अधिकृतरित्या आलेल्या दिवाळी अंकामधूनच पुरस्कारांसाठी अंकांची निवड केली जाणार आहे. पत्रकारिता आणि साहित्य या क्षेत्रांतील मान्यवर या स्पर्धेसाठी परीक्षक असतील.


    दिवाळी अंकांचा शतकोत्सव साजरा करण्यात सरकारने उदासीनता दाखविली. मी दिवाळी अंकांचा वाचक आहे. दिवाळी अंक आजही मला आनंद देतात. म्हणूनच मी या कार्यात सहभागी झालो. हे सांस्कृतिक वैभव जोपासणे, हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. सगळ्यांनी मिळून ते पूर्ण करूया. दिवाळी अंकांनी काळानुरूप बदल केले आहेत. ही परंपरा यापुढेही कायम राहील असा मला विश्वास आहे. गेल्या 106 वर्षांतील दिवाळी अंकांचे कायमस्वरूपी संग्रहालय आणि वाचनालय आम्ही सुरू करत आहोत. या स्पर्धेच्या निमित्ताने संग्रहित झालेल्या सहा अंका पैकी दोन अंक या संग्रहालयासाठी देण्यात येतील. व उर्वरित चार अंका पैकी दोन अंक विविध ठिकाणावर भरवण्यात येणा-या दिवाळी अंक प्रदर्शनात मांडण्यात येतील व दोन अंक स्पर्धेसाठी असतील. संपादकांनी आपले मागील वर्षाचे दिवाळी अंक या संग्रहालयासाठी पाठवून या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करावे. 1909 साली पहिला दिवाळी अंक काढणारे का. र. मित्र यांच्या सन्मानार्थ भारतीय टपाल विभागामार्फत टपाल तिकीट काढण्यासाठी आम्ही प्रस्ताव तयार केला असून तो लवकरच भारत सरकारला सादर केला जाईल व त्यांचे आजगावमध्ये स्मारक उभारण्यात यावे या साठी प्रयत्न केले जातील.

    स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश फी नसून या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणा-यानी आपल्या दिवाळी अंकाच्या सहा (6) प्रती नोंदणीकृत टपाल किंवा कुरिअर मार्फत या संस्थेकडे दिनांक 31 डिसेंबर 2014 पर्यंत किवा तत्पूर्वी पोहोचतील अशा बेताने डॉ. सुनिल पाटील, कार्यकारी संचालक - आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना, सुदर्शन पॅलेस, प्लॉट # 16, पद्मावती सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्याजवळ, माय स्कूलच्या पाठिमागे, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र sunildadapatil@gmail.com, sunil77p@rediffmail.com, या पत्यावर पाठवाव्यात किवा 02322 - 225500, 09975873569

    ReplyDelete